Rashmi Mane
23 वर्षांच्या इतिहासात तेजस या लढाऊ विमानाचा पहिल्यांदा अपघात झाला आहे.
भारतीय हवाई दलाचे एलसीए तेजस हे विमान मंगळवारी राजस्थानमधील जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग दरम्यान क्रॅश झाले.
हे विमान, संपूर्ण लढाऊ क्षमतेसह एक मल्टीरोल फायटर विमान आहे.
हे विमान स्वदेशी घडणीचे आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला प्राधान्य दिले आहे.
भारतीय हवाई दलात सध्या 40 तेजस Mk-1 विमाने चालवते आणि 36,468 कोटी रुपयांची 83 तेजस Mk-1A लढाऊ विमाने विकत घेतली आहेत.
भारतीय वायुसेनेने 2025 पर्यंत जुन्या MiG-21 विमानांना LCA तेजस मार्क 1A विमानाने बदलण्याची योजना आखली आहे.
LCA कार्यक्रमाची कल्पना 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात मिग-21 च्या जागी करण्यात आली होती, जी 1963 पासून हवाई दलात सेवा देत आहे. 2003 मध्ये LCA चे नाव 'तेजस' ठेवण्यात आले.
R