Amol Sutar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या बुलेट ट्रेनमुळे गुजरात आणि मुंबईतील अंतर कमी होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी जाहीर केले, की मुंबई - अहमदाबाद स्पीड ट्रेनचा पहिला विभाग बिलिमोरा ते सुरत 2026 पर्यंत तयार होईल.
विक्रोळी बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाची पाहणीदेखील रेल्वेमंत्र्यांनी केली. भारतातील पहिला हाय स्पीड कॉरिडॉर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात शिंकनसेन यंत्रणा बसविली जात आहे. ही जगातील सर्वात सुरक्षित यंत्रणा आहे.
508 किलोमीटरचे हे अंतर बुलेट ट्रेन अवघ्या 3 तासांत कापणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 1.20 लाख कोटी रुपये इतका आहे.
देशात बनणारा हा पहिला अंडरवॉटर भुयारी मार्ग असून, बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये 6 प्लॅटफॉर्म असतील, ज्याची लांबी 425 मीटर असून, एकूण 16 डबे असतील.
साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि बीकेसी मुंबई अशी या रेल्वेमार्गाची एकूण 12 स्टेशन्स प्रस्तावित आहेत.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मिठी नदीजवळ भूमिगत स्टेशन बांधले जाणार असून, त्याचा बोगदा नदीच्या पलीकडे न्यावा लागेल.
जपान सरकारची 81 टक्के, भारत सरकार 50 टक्के, तर महाराष्ट्र आणि गुजरात सरकारची प्रत्येकी 25 टक्के भागीदारी आहे. जपान आणि चीननंतर ती भारतात धावणार आहे.
R