Deepak Kulkarni
काही तासांतच आपण सर्व नवीन वर्ष 2026 ला मध्ये पदार्पण करणार आहोत. रात्री 12 वाजता 2025 ला निरोप दिला जाणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगभरात वेगवेगळ्या टाईमनुसार नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.
महत्वाची बाब म्हणजे भारताच्या आधी जगभरातील तब्बल 41 देशात नवीन वर्षांचं स्वागत करतात.
पण जगात सर्वात पहिल्यांदा नवीन वर्ष हे किरिबाती बेटावर साजरे केले जाते.या बेटाची ओळख ख्रिस्मस बेटही अशीही आहे.
पृथ्वीवरील पहिला सूर्योदय प्रशांत महासागरात वसलेल्या या द्वीपसमूहातील लाइन आयलंड्स भागात होतो. दिसतो. किरिबातीमध्येच सर्वात आधी 1 जानेवारीची सुरुवात होते असं आंतरराष्ट्रीय दिनरेषेनुसार मानलं जातं.
भारतात 31 डिसेंबर दुपारी 3:30 वाजलेले असते, तेव्हा किरिबातीमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता झालेले असतात. त्यामुळे किरिबाती 1 जानेवारीत प्रवेश करते, त्यामुळे सुमारे 8.30 ते 9 तासांनी किरिबातीपेक्षा भारतात नववर्षाचे स्वागत उशिरा केले जाते.
हॉलंड आणि बेकर बेटांवरील लोक हे सर्वात शेवटी नवीन वर्षाचं स्वागत करतात. हे युनायटेड स्टेट्सपासून जवळ आहे.
किरिबाती बेटानंतर न्यूझीलंडच्या टोंगा आणि चथम बेटांवर नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. जगभरात असे देश आहेत की, ते एक दिवस अगोदरच आणि एक दिवस नंतर नववर्षाचं स्वागत करतात.