Roshan More
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंबर शेवटचा दिवस होता.
एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप याची महायुती या महापालिका निवडणुकीत तुटली आहे.
अनेक महापालिकांमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि फडणवीस ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तो भाजपा यामध्ये थेट लढत होणार आहे.
जालना, परभणी, अमरावती, लातूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, अकोले, नांदेड, सोलापूर, धुळे, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर अशा एकुण 20 महापालिकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप लढत होणार आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहा महापालिकांमध्ये युती झाली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, चंद्रपूर, नागपूर, भिवंडी, पनवेल, कोल्हापूर या महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे.
युती झालेल्या महापालिकांमध्ये मुंबई, नागपूर, भिवंडी, चंद्रपूरमध्ये भाजप मोठा भाऊ ठरला आहे. तर, ठाण्यात शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ ठरला आहे.