सरकारनामा ब्यूरो
राधिका मेनन या भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन आहेत.
कॅप्टन राधिका या जगातील पहिल्या महिला सागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित आहेत.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच त्या 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये शिकाऊ 'रेडिओ ऑफिसर' म्हणून रुजू झाल्या.
'कॅप्टन' पद मिळवणाऱ्या आणि 'इंडियन मर्चंट नेव्ही'च्या त्या पहिल्या महिला आहेत.
समुद्राची आवड असल्यामुळे लहानपणी समुद्रकिनारी भटकताना त्यांनी 'नेव्ही'मध्ये जायचं ठरवलं होतं.
नोकरीमध्ये रुजू झाल्यानंतर घरापासून लांब राहावं लागत होतं पण समुद्रातल्या रोमांचकारी प्रवासातही त्या आनंद घेत होत्या.
'नेव्ही'च्या 'संपूर्ण स्वराज्य' या जहाजाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली.
समुद्रातील बुडत्या जहाजातील मच्छीमारांना वाचवण्याच्या थरारक पराक्रमासाठी त्यांना शौर्य पुरस्कार सन्मानित केला आहे.