Vijaykumar Dudhale
आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून १९९० रोजी ठाकरे कुटुंबीयांमध्ये मुंबईत झाला.
आदित्य ठाकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले असून सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले. किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
आदित्य यांची २०१० मध्ये युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली.
आदित्य ठाकरे यांना २०१८ मध्ये शिवसेनेचे नेते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली होती.
आदित्य यांनी २०१९ च्या निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.
ठाकरे घराण्यातून कोणत्याही प्रकारची निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये २०१९ मध्ये ते राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री बनले. आदित्य ठाकरे यांच्याकडे २०२० मध्ये मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना सळो की पळो करून सोडले आहे.
‘काय झाडी...काय डोंगार...काय हाटील’फेम शहाजीबापूंची जीवनकहाणी