Shahajibapu Patil : ‘काय झाडी...काय डोंगार...काय हाटील’फेम शहाजीबापूंची जीवनकहाणी

Vijaykumar Dudhale

चिकमहूद येथे जन्म

शहाजी पाटील यांचा जन्म सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे 1956 मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकमहूद याच ठिकाणी झाली. पुढील शिक्षण मात्र कराड आणि विटा येथे झाले. कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांनी कायद्याचे पदवीचे शिक्षण घेतले.

Shahajibapu Patil | Sarkarnama

महाविद्यालयात लढवली पहिली निवडणूक

कराडमध्ये महाविद्यालयान शिक्षण घेत असताना शहाजी पाटील यांनी 1975-76 मध्ये पहिली निवडणूक महाविद्यालयात लढवली.

Shahajibapu Patil | Sarkarnama

युवक काँग्रेसचे पदाधिकारी

शहाजी पाटील पुढे 1982 मध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी झाले.

Shahajibapu Patil | Sarkarnama

काँग्रेसकडून 1990 मध्ये विधानसभेची उमेदवारी

काँग्रेसकडून शहाजी पाटील यांना 1990 मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत त्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्याकडून पराभव झाला.

Shahajibapu Patil | Sarkarnama

बापूंच्या अंगावर 1995 मध्ये पहिल्यांदा गुलाल पडला...

काँग्रेसच्या तिकिटावर 1995 मध्ये ते सांगोल्यातून विधानसभेवर निवडून आले आणि बापूंच्या अंगावर पहिल्यांदा गुलाल पडला.

Shahajibapu Patil | Sarkarnama

पुन्हा आमदार

शहाजी पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी 2019 ची निवडणूक जिंकली आणि ते पुन्हा सांगोल्याचे आमदार झाले.

Shahajibapu Patil | Sarkarnama

गुवाहाटी दौऱ्याने राजकीय जीवनाला कलाटणी

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि बापूंच्या राजकीय जीवनाला पुन्हा कलाटणी मिळाली.

Shahajibapu Patil | Sarkarnama

‘काय झाडी...काय डोंगार...काय हाटील’

गुवाहाटीवरून कार्यकर्त्यांशी बोलतानाचा ‘काय झाडी...काय डोंगार...काय हाटील’ हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला आणि सांगोल्याचे शहाजी पाटील हे भारतभर पोचले. खुद्द आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.

Shahajibapu Patil | Sarkarnama

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतील आवाज : डॉ. श्रीकांत शिंदेंना 'संसदरत्न' जाहीर..!

Dr. Shrikant Shinde | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा