सरकारनामा ब्यूरो
बिहारमधील एका छोट्याशा गावातील संस्कृत आणि पर्शियन भाषा अभ्यासकाच्या कुटूंबात दिवंगत नेते राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला होता.
भारत छोडो आंदोलन आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
राष्ट्रपती होण्यापूर्वी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी आणि अन्न मंत्रिपदही भूषवले आहे.
एक हुशार विद्यार्थी असून अन्य क्षेत्रातही उत्तम असल्याने लोक त्यांना राजेंद्र बाबू म्हणत. राष्ट्रपती असतानाही ते आपले जीवन अत्यंत साधेपणाने जगले.
प्रसाद हे त्यांच्या गावातील पहिले व्यक्ती होते, ज्यांनी त्यावेळी कलकत्ता विद्यापीठात प्रवेश मिळवण्यात यश मिळवले होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान लागू केले आणि त्यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून जबाबदारी स्वीकारली.
राष्ट्रपती असताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची कामे पार पडली. ज्यात मुख्यत: गुजरातमधील 'सोमनाथ शिव मंदिरा'च्या जीर्णोद्धाराचा समावेश होता.
उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित केले होते.
राष्ट्रपती असल्याने त्यांना भारतीय घटना समितीचे अध्यक्षही करण्यात आले. राज्यघटनेच्या निर्मितीतही त्यांचा मोलाचा सहभाग आहे.