Deepak Kulkarni
करमाळा तालुक्यातील शिंदे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक रश्मी बागल यांनी लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्या गेल्या वर्षभरापासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
त्यांनी मागील काही दिवसांत सर्वच पक्षांपासून सुरक्षित अंतरावरती राहण्याची भूमिका घेतली होती.
करमाळ्याचे माजी आमदार व माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल व माजी आमदार शामलताई बागल यांच्या रश्मी बागल या कन्या आहेत.
सध्या त्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या त्या संचालिका आहेत.
सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका आहेत. त्यांनी मकाई साखर कारखान्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे पुणे जिल्ह्यातील विश्वासू कार्यकर्ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते यांच्या त्या सून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.