Rashmi Mane
भारतीय रेल्वेला भारताची लाइफ लाईन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
कमी वेळात आणि परवडणाऱ्या किमतीत लोकांना त्यांच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवते. अंदाजे ६८,५२५ किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकवरून दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कुठे आणि कोणत्या राज्यात बांधले गेले होते?
बोरी बंदर हे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन होते जे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.
सुमारे १७५ वर्षांपूर्वी भारतात रेल्वेचा पाया रचला गेला. भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये देशात रेल्वे सुरू केली.
भारतातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे नाव बोरी बंदर होते, जिथून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पहिली ट्रेन ठाण्याला गेली.
या स्टेशनला १८८७ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस त्यानंतर १९९६ मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी नावे देण्यात आली.