Rashmi Mane
जर तुम्ही अजून ITR फाईल केलेला नसेल, तर उशीर न करता लवकर करा. यावर्षीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. पहिल्यांदा ITR फाईल करत असाल, तर हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा!
फॉर्म 16 मध्ये तुमच्या पगाराची, TDS आणि इतर आर्थिक माहिती दिली जाते. हे ITR साठी सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज आहे.
Form 26AS – तुमच्यावर किती टॅक्स भरला गेला आहे हे दाखवतं.
AIS (Annual Information Statement) – बँक, शेअर्स, व्याज याची माहिती असते.
FD, सेव्हिंग अकाउंट, पोस्ट ऑफिस स्कीम्समधून मिळालेल्या व्याजाचं प्रमाणपत्र आणि बँक स्टेटमेंट तयार ठेवा.
सॅलरी स्लिप्समुळे बेसिक पगार, HRA, बोनस, आणि कटोतींची माहिती मिळते – जे ITR मध्ये अचूक भरता येते.
LIC, PPF, ELSS यांसारख्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या रसीद जमा ठेवा. यामुळे टॅक्स वाचवता येतो.
HRA क्लेम करण्यासाठी घरभाड्याच्या रसीद आणि रेंट अॅग्रीमेंट असणं गरजेचं आहे. त्यामुळे करभार कमी होऊ शकतो.