Rashmi Mane
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा जुलै महिन्याचा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार!
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 8 ऑगस्टला थेट खात्यावर होणार सन्मान निधी जमा होणार आहे.
या योजनेतून महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत दिली जाते.
बँक खात्यात पैसे आले की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील पर्याय वापरता येतील.
तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करून खात्यात पैसे जमा झालेत का, याची माहिती मिळवा.
बँकेच्या वेबसाईट किंवा अॅपवरून लॉगिन करून बँक स्टेटमेंट तपासा. निधी जमा झाल्याचा तपशील पाहा.
मोबाईलवर मेसेज आला आहे का, हे पाहा. अन्यथा जवळच्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन तपासणी करा.
जर तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट सक्रिय नसेल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही.