सरकारनामा ब्यूरो
राजस्थानमध्ये पहिल्यांदाच एका IPS अधिकाऱ्याची बढती करण्याऐवजी त्यांचे डिमोशन करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
डिमोशन करण्यात आलेले पंकज चौधरी हे 2009 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. कार्मिक विभागाने त्यांच्या डिमोशनचे आदेश जारी केले आहेत.
12 वर्षांच्या सेवेनंतर, ते लेव्हल 11 वेतन श्रेणीतील अधिकारी होते परंतु सरकारने त्यांचे 10 व्या कनिष्ठ स्तर वेतनश्रेणीत डिमोशन केले.
चौधरी हे सध्या कम्युनिटी पोलिसिंगचे एसपी आहेत. काही वर्षांआधी त्यांचा कौटुंबिक वाद झाला होता. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला.
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरे लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता. काही वर्षे न्यायालयात हा खटला चालल्यानंतर त्यांनी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करून हा खटला जिंकला होता.
राज्य सरकारकडून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू होती. पण चौकशी संपण्याआधीच त्यांचे डिमोशन करण्यात आले.
पंकज यांचे मुकुल चौधरी यांच्यासोबत लग्न झाले आहे. मुकुल चौधरी या शशिदत्त यांच्या कन्या आहेत. ते भैरोसिंह शेखावत यांच्या सरकारमध्ये कायदा मंत्री होते.