सरकारनामा ब्यूरो
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोनेरी काठ असलेली क्रिम रंगाची पांढरी साडी नेसली होती. तर जाणून घेऊयात या साडीची किती किमंत किती आहे?
सीतारामन यांनी प्रत्येकवेळी बजेटमध्ये नेसलेल्या साड्यांचे काही तरी खास वैशिष्ट्य असते.
त्यांनी नेसलेल्या साड्या या भारताची विविध संस्कृती आणि वारशाचे प्रतिनिधित्व दर्शवणाऱ्या असतात.
सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी सोनेरी काठ असलेली क्रिम रंगाची साडी नेसली होती.
सीतारमण जेव्हा बिहारमधील मिथिला कला संस्थेत गेल्या होत्या, तेव्हा त्यांना दुलारी देवी यांनी ही साडी भेट दिली होती.
निर्मला सीतारमण यांनी दुलारी देवींच्या मधुबनी कलेचा आदर आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवत ही साडी नेसली होती.
मधुबनी कला आणि बिहारच्या सांस्कृतिक वारशाला महत्त्व दिले.
मधुबनी प्रिंट असलेली ही साडी जवळपास 6-7 हजार पासून ते 40-45 हजार रुपयांना मिळते.