सरकारनामा ब्यूरो
भारतीय वायुसेनेसाठी उड्डाण करणाऱ्या भावना कंठ या देशातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत.
29 वर्षांच्या या तरुणीने पहिल्या महिला फायटर पायलटची प्रतिष्ठित पदवी मिळवून इतिहास रचला.
भावना या मूळच्या बिहारमधील दरभंगा येथील आहेत.
बिहारमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि बंगळुरूच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये BE केले.
शालेय आणि व्यावसायिक जीवनात उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
नेहमीच विमाने उडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावना या हवाई दलाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करत फायटर स्ट्रीममध्ये सामील झाल्या.
अडथळ्यांचा सामना करत अनेक विक्रम त्यांनी मोडीत काढले आहेत.
भावना या महिलांसाठी तसेच भविष्यात फायटर पायलट बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक युवांसाठी एक प्रेरणा आहेत.
R