Rashmi Mane
भारताच्या लष्करातदेखील महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. त्यासाठी महिला लष्करात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत.
कानिटकर या महाराष्ट्रातील लष्कर पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, तर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट जनरल आहेत.
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवापदक मिळाले आहे.
तीन स्टार रॅन्क मिळालेल्या त्या देशातील दुसऱ्याच महिला आहेत.
कानिटकर यांनी पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. तसेच नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या (सीडीएस- वैद्यकीय) उपप्रमुख होत्या.
डॉ. कानिटकरांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर हेसुद्धा लष्करात अधिकारी होते. तीन स्टर रॅन्क पदापर्यंत पोहाेचणारे हे एकमेव दाम्पत्य आहे.
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.
डॉ. माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरलपद भूषवणाऱ्या पहिल्याच बालरोगतज्ज्ञ आहेत.