Ganesh Sonawane
महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्याने राज्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता अनेक फायदे होतील.
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल
मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.
कृषी दरांनुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील. मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.
४. शेतकऱ्यांप्रमाणे सौर ऊर्जेचे लाभ मिळतील. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्यशेती करण्यासाठी मच्छीमार पात्र होतील.
५. शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यांसाठी अनुदान मिळेल. मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये नीलक्रांती घडेल व तरुणांना रोजगार मिळेल.
उपकरणे व यंत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. सागरी व अंतर्गत मासेमारी क्षेत्रामध्ये आर्थिक विकास होईल.
मच्छीमारांना शासनातर्फे डिझेल पंप मिळतील. राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होईल.
मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅंडल व्हील एरेटरस, एअर पंप करीता अनुदान मिळणार. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळणार.