सरकारनामा ब्यूरो
परिपूर्ण आणि फिट शरीर मिळविण्यासाठी आजकाल प्रत्येकजण जिम लावतात किंवा डाएट करतात. यासाठी एका युवा अधिकाऱ्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.
भोपाळचे सचिन अतुलकर हे पोलिस खात्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आयकॉन आहेत.
वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आयपीएस झालेले सचिन हे सध्या छिंदवाडाच्या डीआयजी (Deputy Inspector General) पदावर तैनात आहेत.
निरोगी शरीरासाठी व्यस्त दिनचर्येतूनही ते आपल्या फिटनेस आणि व्यायामासाठी नियमित वेळ देतात.
अधूनमधून योगा करतात. ज्यामुळे सकारात्मक भावना वाढते. याच उद्देशाने इतरांनाही ते नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असतात.
तंदुरुस्तीसाठी आठवड्यातील सातही दिवस ते ठरवलेला दिनक्रम पाळतात आणि त्यानुसार नियमित व्यायाम करतात.
व्यायामाबरोबर खाण्यापिण्याच्या सवयींवरही त्यांचे विशेष लक्ष असते. फळांसोबत भाज्या, कडधान्ये आणि पौष्टिक पदार्थांचे ते रोज सेवन करतात.
सचिन यांच्या या फिटनेस फंड्यामुळे सगळ्यांना फायदा झाला आहे. ज्यामुळे देशभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.
चित्रपटातल्या हिरोला मागे टाकेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. सिंघम सिम्बासारखे डॅशिंग आयपीएस म्हणून त्यांना ओळखतात.
R