सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 मध्ये झाला.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे अन् माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते चुलत भाऊ आहेत.
2006 मध्ये आपल्या काकांच्या शिवसेना पक्षातून राजीनामा देत त्यांनी मुंबईत स्वत:चा नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचे ठरवले.
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
काकांसोबत असंख्य सभांना हजेरी लावल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणात रस होता.
ते एक उत्तम वक्ता आहेत. शिवाय व्यंगचित्रकारदेखील आहेत.
राजकीय नेते असूनही तरुण वयात शिकलेले संगीत अजूनही त्यांनी आपल्यात रुजवून ठेवले. व्यस्त जीवनातून वेळ काढून ते गिटार, तबला आणि व्हायोलिन वाजवतात.
बाळासाहेब यांनी सुरू केलेल्या 'मार्मिक' या साप्ताहिक मासिकात प्रदर्शित होणाऱ्या व्यंगचित्रांचे त्यांनी योगदान दिले आहे.
मराठी लोकांसाठी आपले मत ठामपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या भाषणांना लोक आवर्जून उपस्थित राहतात.
R