सरकारनामा ब्यूरो
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच उद्धव ठकारेंना पुण्यात जबरदस्त धक्का मिळाला आहे.
पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे , राजेश पांडे , भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा सुरु होती. अखेर काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
लवकरच महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवक आणि पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे.