सरकारनामा ब्यूरो
बिहारमधून चारवेळा लोकसभेची निवडणूक लढवून यशस्वीरित्या जिंकलेले मराठी नेते म्हणजे मधू लिमये.
पुण्यात जन्मलेले मधू लिमये यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस समाजवादी पक्षातून चळवळींनमध्ये सहभागी होते.
स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे त्यांचे शिक्षण थांबवण्यात आले होते. 1940 ते 1945 या काळात त्यांना 4 वर्षाचा तुरुंगवासही भोगावा लागला होता.
1947 च्या "सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या अँटवर्प' या परिषदेमध्ये लिमये हे भारतीय समाजवादी चळवळीचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
1955 ला गोवा मुक्ती संग्रामात त्यांना 12 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.त्यांने 19 महिने पोर्तुगिजांच्या कैदेत घालवले.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी मधू यांनी 1957 ला मुंबईतील वांद्रेतून निवडणूक लढवली होती. परंतु तेथे त्यांचा पराभव झाला.
1964 मध्ये मधू यांनी पहिल्यांदाच संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर बिहारमधील मुंगेर मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवली होती. आणि ती मोठ्या मतधिक्क्यांनी जिंकत त्यांनी संसदेत एन्ट्री केली.
संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्षपदी त्यांनी काम केलं. यानंतर त्यांनी 1964 -1967 या काळात बिहारमधून चारवेळा निवडणूक लढले आणि जिंकलेही
1980 नंतर त्यांनी राजकीय वावर कमी करत ते 1982ला राजकारणातून निवृत्ती घेतली. लिमये यांनी हिंदी आणि मराठी भाषेत 60 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.