सरकारनामा ब्यूरो
एकाच गावतील पाच मैत्रीणींनी पोलिस कॉन्स्टेबल बनून इतिहास रचला आहे. जाणून घेऊनयात त्यांच्या विषयी...
राजस्थान येथील राजपूत बहुल गावातील पदम कंवर, मनिता कंवर, कृष्णा कंवर, प्रतीक्षा कुंवर आणि रवीना कंवर यांनी हा इतिहास रचला आहे.
बारावीनंतर, या पाच मैत्रीणींनी गावात राहूनच राजस्थान पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तयारी केली होती.
जनजातीय उप-योजना (टीएसपी) संवर्गातून त्यांनी परीक्षा दिली. कठोर परिश्रम केल्यामुळे या पाच जणींची पोलिस सेवेसाठी निवड झाली.
पोलिस कॉन्स्टेबल बनलेल्या या पाच मैत्रीणीं पैकी चार जणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
मनिता कंवर सध्या राजस्थान येथील बारलुट पोलिस स्टेशनमध्ये तर, पदम कंवर या शिवगंज पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
कृष्णा कंवर यांची नियुक्ती अबुरोड पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
प्रतीक्षा कुंवर या सिरोही सदर पोलिस ठाण्यात आणि आणि रवीना कंवर या पीटीएस जयपूरमध्ये कार्यरत आहेत.