Mangesh Mahale
कुलीचे काम करीत असताना मोबाईवर अभ्यास करुन एकानं युपीएससी परीक्षा पास केली.
केरळ मधील मुन्नार येथील श्रीनाथ के यांनी हे यश संपादन केले आहे.
मोबाईलचा योग्य तो वापर करुन कुलीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीनं इतिहास घडवला.
आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर श्रीनाथ के यांनी रेल्वे स्टेशनवरील वाय-फायचा वापर करुन युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवर ते कुलीचे काम करीत होते. सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते.
स्पर्धा परीक्षेच्या ट्युशनसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
रेल्वे स्थानकावरील मोफत वायफायचा उपयोग करुन त्यांनी ऑनलाइन लेक्चर ऐकत अभ्यास केला.
KPSC (केरल पब्लिक सर्विस कमीशन) परीक्षा पास केली त्यानंतर चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली.