Rashmi Mane
भारत यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. हा दिवस देशाच्या अभिमानाचा आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृतींचा प्रतीक आहे.
15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय तिरंगा फडकवतील. हा क्षण संपूर्ण देशासाठी गौरवाचा असतो.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटीश सत्तेतून मुक्त झाला, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. हे दोन्ही दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन दोन्ही दिवशी तिरंगा फडकवला जातो, पण त्याच्या पद्धतीत महत्त्वाचा फरक आहे.
15 ऑगस्टला ध्वज खालून वर ओढून चढवला जातो आणि नंतर तो उघडून फडकवला जातो. कारण, 1947 साली ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा चढवला गेला होता.
15 ऑगस्टला तिरंगा वर चढवण्याची क्रिया ध्वजारोहण म्हणतात. यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि झेंड्याला सन्मान देण्याचा प्रतीकात्मक संदेश आहे.
26 जानेवारी रोजी तिरंगा आधीच वर बांधलेला असतो आणि तो फक्त दोरीने उघडला जातो. ही प्रक्रिया ध्वज फडकवणं म्हणून ओळखली जाते.