Rashmi Mane
या वर्षी भारत 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. दरवर्षीप्रमाणेच 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करतील आणि तिरंगा फडकवतील.
लाल किल्ला हा दिल्लीतील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध स्मारक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी याचे महत्त्व आहे. येथे तिरंगा फडकवण्याची परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रतीकाप्रमाणे आहे.
हा किल्ला मुघल बादशाह शाहजहानने बांधला होता. तो फक्त एक लष्करी किल्ला नव्हता, तर शाहजहानच्या नवीन राजधानीचा केंद्रबिंदू होता.
लाल किल्ला बांधण्यापूर्वी मुघल साम्राज्याची राजधानी आग्रा होती. 1638 मध्ये शाहजहानने राजधानी दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला.
शाहजहानने दिल्लीमध्ये आपली नवी राजधानी ‘शाहजहानाबाद’ उभारली. लाल किल्ला हा या राजधानीचा मुख्य राजवाडा होता.
लाल किल्ल्याचे बांधकाम 1638 मध्ये सुरू झाले आणि 1648 मध्ये पूर्ण झाले. हा भव्य किल्ला बांधण्यासाठी जवळपास 10 वर्षे लागली.
लाल किल्ल्याच्या भिंती सुमारे 2.4 किलोमीटर लांब असून 18 ते 33 मीटर उंच आहेत. लाल दगडाच्या भव्य भिंतींमुळेच याला ‘लाल किल्ला’ असे नाव मिळाले.
आज लाल किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. तो भारतीय इतिहास, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.