Ganesh Sonawane
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चारा लागवड योजनेची घोषणा केली आहे.
वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीसाठी एकरी १ लाख २१ हजार ८१५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
तर सार्वजनिक जमिनीसाठी एकरी १ लाख ५५ हजार ३ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
चारा लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
जमिनीची कागदपत्रे, आवश्यक अर्ज आणि अन्य पात्रता निकषांची माहिती घ्यावी.
योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
योजनेअंतर्गत २४५ मनुष्यदिवसांच्या मजुरीसाठी ७७ हजार ६६५ रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय बियाणे, खते आणि अन्य आवश्यक साहित्य खर्चासाठी ४४ हजार १५० रुपयांची तरतूद आहे.
या योजनेतून जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणार आहे.