Sushma Swaraj: प्रभावी नेतृत्व, उत्तम वक्तृत्व अन् भाजपचा आक्रमक लोकप्रिय चेहरा !

सरकारनामा ब्यूरो

कणखर नेतृत्त्व

भाजपच्या प्रमुख महिला नेत्या राहिलेल्या दिवंगत सुषमा स्वराज या राजकारणातील प्रभावी अन् कणखर चेहरा होत्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

अभाविपतून राजकारणात

पंजाब विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात पहिले पाऊल टाकले.

Sushma Swaraj | Sarkarnama

सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री

सुषमा स्वराज या वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हरयाणाच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री तर दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री

इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

प्रभावशाली नेत्या

मोदी मंत्रिमंडळातील पहिल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे अधिक प्रभावशाली नेत्या होत गेल्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

परदेशी भारतीयांना मदत

अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी त्या सदैव तत्पर राहिल्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

गरजूंसाठी वैयक्तिक लक्ष

गरजूंना मदत करणे आणि संकटात सापडलेल्यांना दिलासा देणे यांसारख्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले.

Sushma Swaraj | Sarkarnama

उत्तम अन् प्रभावी

प्रभावी नेतृत्व, उत्तम वक्तृत्व, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेंवरील प्रभुत्व असलेल्या त्या एक परिपूर्ण नेत्या होत्या.

Sushma Swaraj | Sarkarnama

जिंकली लोकांची मने

राजकारणातील उत्तम कारकिर्दीमुळे देशातील लोकांची मने जिंकली आणि घराघरांत आपले नावही त्यांनी कोरले.

Sushma Swaraj | Sarkarnama

Next : 'सिक्सर किंग' युवराज सिंग, क्रिकेटनंतर आता राजकारणाच्या मैदानात!