Aslam Shanedivan
केंद्र सरकारने करप्रणालीत पारदर्शक आणताना 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल केले आहेत.
या बदलांप्रमाणे 'फॉर्म 16' बंद करत त्या जागी एक नवीन आणि स्मार्ट फॉर्म आणला जाणार आहे
जून-जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आता 'फॉर्म 16' ऐवजी ऑफिसकडून 'फॉर्म 130' दिला जाणार
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टीडीएस (TDS) कापल्यानंतर टॅक्स रिफंडसाठी आता 'फॉर्म 130' अनिवार्य असेल. जो थेट सरकारच्या 'TRACES' पोर्टलवरून डाऊनलोड करावा लागेल.
पगारदार आणि पेन्शनधारक: 'फॉर्म 130' आणि ऑटोमेटेड सिस्टीममुळे टॅक्स फायलिंग अत्यंत सोपे होईल. कागदपत्रांचा ढिगारा कमी होईल.
पेन्शन आणि व्याजाचे उत्पन्न एकत्र दिसल्याने ज्येष्ठ नागरिकांची होणारी ओढाताण थांबेल.
सर्व प्रक्रिया 'सिस्टम-ड्रिवन' असल्याने करचोरीला लगाम बसेल आणि प्रामाणिक करदात्यांचा फायदा होईल.