BJP Politics : भाजपनं तिकीट कापलं, प्रदेश कोअर कमिटीतून नाव वगळलं, माजी खासदारानं राजकारण सोडतं थेट नोकरीचा मार्ग पकडला

Aslam Shanedivan

त्रिपुरा

त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यातील दुर्गम गावात राहणारे रेबती त्रिपुरा यांनी राजकारणाला राम राम करत आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

रेबती त्रिपुरा

माजी खासदार असणारे भाजपचे नेते रेबती त्रिपुरा यांनी पुन्हा एकदा शिक्षक म्हणून नोकरी सुरू केलीय.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

शिक्षक म्हणून काम

रेबती त्रिपुरा हे २००१ मध्ये आगरताळाच्या महात्मा गांधी मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

भाजप प्रवेश

२०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ते पूर्व त्रिपूरा मतदारसंघातून खासदार बनले.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

२०२४ ची निवडणूक

पण रेबती यांना हे यश टिकवता आले नाही. त्यांचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यादीतून नाव कापले गेले.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

देववर्मन यांना तिकीट

रेबती यांच्या ऐवजी राजघराण्यातील टिपरा मोथा पार्टीचे प्रमुख प्रद्योत किशोर देववर्मा यांची बहीण कृति देवी देववर्मन यांना तिकीट देण्यात आलं

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

कोअर कमिटी

ते भाजपच्या त्रिपुरा प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य होते. मात्र त्यानंतर ते राजकारणात सक्रीय न राहिल्याने कोअर कमिटीतूनहीनाव गायब झालं.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

शिक्षकी पेशा

त्यांनी पुन्हा शिक्षकी पेशा स्विकारला असून सध्या माझ्याकडे राजकीय जबाबदारी नसल्यानं सरकारी शाळेत पुन्हा परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

निवृत्तीवेतन

किमान या नोकरीतून निवृत्तीनंतर मिळणारे लाभ आणि किमान ५० हजार रुपये निवृत्तीवेतनही मिळेल असे त्यांनी म्हटलं आहे.

Former BJP MP Rebati Tripura | sarkarnama

Teacher Recruitment GR : शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल; सरकारने GR काढला!

आणखी पाहा