Mayur Ratnaparkhe
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असून, त्यांना राज्यसभेची उमेदवारीही मिळाली आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी 2016मध्ये काँग्रेस सोडून भाजपात गेले होते.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी 2017मध्ये भाजपात प्रवेश केला होता.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी 2023मध्ये भाजपात प्रवेश केला.
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी 2016मध्ये भाजपात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या जवळचे समजले जाणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटोनी यांचे पुत्र केरळमधील काँग्रेसचे नेते अनिल अँटोनी यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केला आहे.
NEXT : विधान परिषदेला अर्ध्या मताने पराभव ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : विलासराव देशमुख