सरकारनामा ब्यूरो
राजकारणाला एक सकारात्मक वळण देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांनी कायमच निरपेक्षपणे कार्य केले. ज्यामुळे जनतेच्या मनात त्यांचे आदराचे स्थान आहे.
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील मिरज या गावी जन्म झालेल्या वसंतदादा यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले.
चार ववेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या वसंतदादांनी राजस्थानचे राज्यपाल पदही त्यांनी तितक्याच चोख पद्धतीने सांभाळले.
पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुढील 25 वर्षे त्यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केले.
पक्षाला प्राधान्य देत राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षपदावरही उत्तम कारकीर्द गाजवली.
महाराष्ट्राचे नेतृत्व करताना त्यांनी समाजहिताचे तसेच प्रगतीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेत सकारात्मक क्रांती घडवून आणली.
पाणी अडवा, पाणी जिरवा हा मंत्र जनतेला देत मुख्यत: शैक्षणिक, आर्थिक, ग्रामीण आणि औद्यागिक विकासावर त्यांनी अधिक भर दिला.
स्वातंत्र्यलढ्यात टेलिफोनच्या तारा तोडणे, जाळपोळ करणे, ब्रिटिशांच्या सामानांचे नुकसान करणे; तसेच अवजारांचा वापर करून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याची भूमिका निभावली.
कायदेभंग चळवळीदरम्यान सोलापूरमध्ये आपले देशाचे चार युवक शहीद झाले. त्यांची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता.
R