Rahul Shewale News : राहुल शेवाळे यांची मुलं लखपती; एकूण संपत्ती किती?

Akshay Sabale

दक्षिण मध्य मुंबईतून अर्ज -

शिंदेसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Rahul Shewale | sarakrnama

पत्नी करोडपती -

अर्जासोबतच्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची दोन मुले लखपती तर पत्नी करोडपती आहे.

Rahul Shewale | sarkarnama

दोन्ही मुलं लखपती -

18 वर्षांच्या स्वयम शेवाळेच्या नावावर 12 लाख 18 हजारांची रोख, तर स्वयमकडे 7 लाख 45 हजार 900 रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोनेही आहे.

Rahul Shewale | sarkarnama

सोनं -

13 वर्षांच्या वेदांतकडे 11 लाख 51 हजार रोख तर 7 लाख 45 हजार 900 रुपयांचे 100 ग्रॅम सोने आहे.

Rahul Shewale | sarakrnama

स्थावर मालमत्ता -

राहुल शेवाळेंची 2019 मध्ये स्थावर मालमत्ता नव्हती. मात्र, यंदा 7 कोटी 21 लाखांची मालमत्ता दाखवण्यात आली आहे.

Rahul Shewale | sarkarnama

जंगम मालमत्ता -

राहुल यांची जंगम मालमत्ता एकूण 62 लाख 4 हजार तर त्यांची पत्नी कामिनी यांची जंगम मालमत्ता 2 कोटी 21 लाख 20 हजार दाखवण्यात आली आहे.

Rahul Shewale | sarakarnama

सोनं, स्थावर मालमत्ता -

त्यांच्याकडे 2 कोटी 75 लाखांची स्थावर मालमत्ता असून 37 लाख 29 हजारांचे सोने आहे.

Rahul Shewale | sarakrnama

कार -

राहुल यांच्याकडे इनोव्हो क्रेस्टा कार आहे. तर, पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडे मारूती स्विफ्ट झेड एक्सआय सिरीजमधील कार आहे.

Rahul Shewale | sarkarnama

NEXT : 4 कोटींचं कर्ज अन् 50 तोळे सोनं; रावसाहेब दानवेंची एकूण संपत्ती किती?

Raosaheb Danve | sarkarnama