सरकारनामा ब्यूरो
देशातील लाखो मुलं-मुली दरवर्षी UPSC परीक्षा देतात. मात्र, काहीच असतात जे यशस्वी होतात.
काही मुलं-मुली असेही ही आहेत, जे अहोरात्र मेहनत करुनही त्यांच्या पदरी अपयश येते. परंतु ते हार न मानता जिद्दीच्या जोरावर यशस्वी होतात. अशीच सक्सेस स्टोरी आहे मृदुपानी नंबी यांची..
मृदुपानी नंबी यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला. त्यांचे बालपण ही येथेच गेले.
मृदुपानी यांचे प्राथमिक शिक्षण हे हैदराबाद झाले. तसेच त्यांनी नारायण विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले.
उस्मानिया विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली.
मास्टर्सनंतर त्यांनी UPSC परीक्षेला दिली. पण पहिल्याच प्रयत्नात त्या प्रिलिम्समध्ये नापास झाल्या.
2022 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSCद्वारे घेण्यात येणाऱ्या भारतीय इंजिनिअरिंग सेवा परीक्षेत त्यांनी 21 वा क्रमांक मिळवला.
मृदुपानी या Engineering Services Examination (IES) अधिकारी आहेत.