Radheshyam Mopalwar : प्रशासकीय सेवेतून निवृत्त, आता 'दिल्ली'चे स्वप्न पाहणारे राधेश्याम मोपलवार कोण आहेत ?

Chaitanya Machale

वॉर रूम महासंचालकपदाचा राजीनामा

राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणासाठी हा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

काही दिवसांपूर्वी एमएसआरडीसीतून केले दूर

'एमएसआरडीसी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून मोपलवार यांना काही दिवसांपूर्वीच दूर करण्यात आले होते.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल प्रकल्पांना दिली गती

राज्यातील मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वॉर रूमची स्थापना केली होती.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

फेब्रुवारी 2018 मध्ये झाले होते सेवानिवृत्त

राधेश्याम मोपलवार हे फेब्रुवारी 2018 मध्ये वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

वॉर रूमचे प्रमुख..

'एमएसआरडीसी'मध्ये असतानाच मोपलवार यांची वर्णी मुख्यमंत्री वॉर रूमवर लागली होती.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

समृद्धी महामार्गाला दिली गती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला गती दिली. या प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खुला झाला.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

दोघांशी चांगले संबध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोपलवार यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

राजीनामा स्विकारला

वॉर रूमच्या महासंचालकपदाचा मोपलवार यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असल्याचे समजते.

Radheshyam Mopalwar | Sarkarnama

लोकसभेच्या रिंगणात उतरणार

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मोपलवार हे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Loksabha Matdarsangh | Sarkarnama

NEXT: मोदींचा 'हिंदुहृदयसम्राट' उल्लेख करुन चर्चेत आलेले काँग्रेसचे शशी थरुर...

येथे क्लिक करा...