VK Pandian : IAS ते मुख्यमंत्री? नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी बनू शकतात व्ही. के. पांडियन...

Rajanand More

माजी आयएएस अधिकारी

व्ही. के. पांडियन हे मूळचे तामिळनाडूचे असून ओडिशा केडरमधील माजी आयएएस अधिकारी आहेत.

VK Pandian | Sarkarnama

प्रशासकीय सेवा

2000 मध्ये 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी मयूरभंज व गंजम या जिल्ह्यांतून आपल्या कार्याची सुरुवात केली.

VK Pandian | Sarkarnama

खासगी सचिव

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे 2011 मध्ये खासगी सचिव म्हणून प्रभावीपणे काम केले. पदाचा गैरवापर केल्याचा अनेकदा आरोप.

VK Pandian | Sarkarnama

निवडणुकीची रणनीती

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडद्यामागून रणनीतीची जबाबदारी पार पाडली.

VK Pandian | Sarkarnama

बीजेडीमध्ये प्रवेश

मागील वर्षी व्हीआरएस घेत अधिकृतपणे बिजू जनता दलामध्ये प्रवेश. व्हीआरएसनंतर दुसऱ्याच दिवशी नवीन ओडिशा योजनेचे अध्यक्षपद व कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला.

VK Pandian, Naveen Patnaik | Sarkarnama

निवडणुकीत सक्रीय

लोकसभा निवडणुकीत सक्रीयपणे सहभाग. पटनायक यांच्यासोबत सावलीप्रमाणे असून अनेक महत्वाच्या जबाबदारी पार पाडत आहेत.

VK Pandian | Sarkarnama

स्टार प्रचारक

निवडणुकीत स्टार प्रचारकाची भूमिकाही पार पाडत असून पक्षाच्या यादीत पटनायक यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी.

VK Pandian | Sarkarnama

राजकीय वारसदार

नवीन पटनायक यांचे अत्यंत विश्वासू असल्याने राजकीय वारसदार म्हणून पांडियन यांचे नाव आघाडीवर.

Naveen Patnaik, VK Pandian | Sarkarnama

...तर मुख्यमंत्री

प्रशासन, पक्षात आणि जनतेमध्येही कामाचा ठसा उमटवल्याने पुढील काळात पांडियन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे येऊ शकतात, अशी चर्चा.

Naveen Patnaik, VK Pandian | Sarkarnama

NEXT : मोदींच्या प्रत्येक भाषणात ज्यांचा उल्लेख ते सॅम पित्रोदा आहेत तरी कोण?