माजी IAS शत्रुघ्न सिंह कोण आहेत? महाराष्ट्र सरकारने UCC समितीचे सदस्य म्हणून केली नियुक्ती

Roshan More

नियुक्ती

महाराष्ट्रात समान नागरी कायदा समितीत (UCC) माजी IAS अधिकारी शत्रुघ्न सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Shatrughan Singh | sarkarnama

1983 बॅचचे IAS अधिकारी

शत्रुघ्न सिंह हे उत्तराखंड कॅडरचे 1983 बॅचचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1956 रोजी झाला असून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Shatrughan Singh | sarkarnama

उत्तर प्रदेशातही प्रशासकीय सेवा

उत्तराखंड राज्याची निर्मिती होण्यापूर्वी शत्रुघ्न सिंह हे उत्तर प्रदेश कॅडरमध्ये कार्यरत होते. मुजफ्फरनगरसह विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या.

Uniform Civil Code | sarkarnama

उत्तराखंडचे 13 वे मुख्य सचिव

शत्रुघ्न सिंह यांनी उत्तराखंडचे 13 वे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. याशिवाय ते मुख्य माहिती आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागारही राहिले आहेत.

Pushkar Singh Dhami | sarkarnama

PMO मध्येही महत्त्वाची जबाबदारी

शत्रुघ्न सिंह यांनी पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे प्रशासन आणि धोरणनिर्मितीचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.

Narendra modi | sarkarnama

UCCचा आधीच अनुभव

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (UCC) नियमावली तयार करण्याच्या प्रक्रियेत शत्रुघ्न सिंह सहभागी होते. UCC लागू करण्यासाठी नियम तयार करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. उत्तराखंडमध्ये UCC 27 जानेवारी 2025 पासून लागू आहे.

महाराष्ट्राच्या UCC समितीत नियुक्ती

महाराष्ट्र सरकारने 21 सप्टेंबर 2026 रोजी शत्रुघ्न सिंह यांची UCC समितीचे सदस्य-सह-वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती केली. समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्राची UCC समिती

न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राने सात सदस्यीय UCC समिती स्थापन केली आहे. समितीला कायदेशीर, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय पैलूंचा अभ्यास करून सरकारला अहवाल देण्याची जबाबदारी आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

Gyanesh Kumar
येथे क्लिक करा