Mangesh Mahale
केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये केदार जाधव यानं 95 सामने खेळले आहेत.
त्यात 81 डावात त्याने 1208 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69इतकी राहिली आहे.
केदार जाधव याने आयपीएलमध्ये चार अर्धशतके ठोकली आहेत.
केदार जाधव याने भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
त्यामध्ये 42.09 च्या प्रभावी सरासरीने 1389 धावा केल्या आहेत.
टी-20 सामन्यांमध्ये त्याची कारकीर्द काही खास नव्हती.
केदार जाधवने केवळ 9 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.
केदार जाधव हा मूळचा पुण्याचा असून तो आता क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरत आहे.