Mayur Ratnaparkhe
सीपीआय(एम)चे वरिष्ठ नेते मरियम अलेक्झांडर बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
हे पद भूषवणारे पक्षाच्या केरळ युनिटमधील ते दुसरे नेते बनले आहेत.
केरळ स्टुडंट्स युनियनमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
ते एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि सीपीआय एमच्या युवा शाखेतील डीवायएफआयचे अध्यक्षही झाले.
आणीबाणीच्या काळात विद्यार्थी आणि तरुणांना संघटित करण्यासाठी ओळखले जाणारे आणि त्यांना तुरुंगातही जावे लागलेले विद्यार्थी नेते ते होते.
वयाच्या ३२ व्या वर्षी, एम बेबी यांनी १९८६ मध्ये सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून राज्यसभेत प्रवेश केला आणि १९९८ पर्यंत ते राज्यसभेत राहिले.
बेबी यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते आणि १९९९ मध्ये त्यांना सीपीआय(एम) केंद्रीय समितीत समाविष्ट करण्यात आले.
तथापि, केरळ सीपीआयएममधील बदलत्या समीकरणांमुळे पक्षातील त्यांची वाढ मंदावली होती.
बेबी यांनी २००६ मध्ये कुंडारा विधानसभा जागा जिंकली होती.