सरकारनामा ब्यूरो
चर्चेत आलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
पालनपूर सत्र न्यायालयाच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना शिक्षा जाहीर करण्यात आली.
28 वर्षांपूर्वीच्या प्रकरणासंबंधित नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट (NDPS) अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
1996 मध्ये भट्ट हे बनासकांठाचे पोलिस अधीक्षक असताना पालनपूरच्या हॉटेलमध्ये 1.5 किलो अफू ठेवून वकिलाविरुद्ध पुरावे तयार केल्याचा आरोप होता.
1990 मध्ये जामनगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक असताना झालेल्या दंगलीनंतर प्रभुदास वैष्णानी यांच्यावर कोठडीत छळ केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप होता.
कोठडीतील मृत्यू प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आता त्यात आणखी एका शिक्षेची भर पडली आहे.
2002 च्या गुजरात दंगलीतील भूमिकेबाबत त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. हे प्रकरणही चांगलेच गाजले होते.
संजीव भट्ट हे गुजरात केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत.
आयआयटी बॉम्बेमधून एमटेक पदवी प्राप्त केल्यानंतर 1988 मध्ये ते आयपीएस झाले.
R