Deepak Kulkarni
ठाकरे गटात नाराज असलेल्या माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला.
दोन महिन्यांपूर्वीच घोलप यांनी ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता.
माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
ठाकरे गटात होत असलेली घुसमट पाहून मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आता मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ते पार पाडणार आहे. शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम केले जाईल, असेही घोलप म्हणाले.
बबनराव घोलप उर्फ नाना हे नाशिक जिल्ह्यातील एक भारतीय राजकारणी आहेत.
देवळाली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते .
1990-2009 मध्ये ते सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. ते महाराष्ट्र सरकारमध्ये समाजकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.