Aslam Shanedivan
मिझोरामचे माजी राज्यपाल तथा भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे आज निधन झाले.
वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून याची माहिती भाजपने 'X' वर पोस्ट करत दिलीय. त्यांच्यावर लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वराज कौशल हे संसद सदस्या आणि राज्यमंत्री सुश्री बांसुरी स्वराज यांचे वडील असून त्यांचे सांत्वन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
स्वराज कौशल यांनी दिल्ली विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले असून वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले.
१३ जुलै १९७५ रोजी त्यांचा विवाह सुषमा स्वराज यांच्याशी झाला असून दोघांच्या कामगिरीचा विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे
स्वराज कौशल हे भारतातील सर्वात तरुण राज्यपाल राहिले असून अवघ्या ३७ व्या वर्षी त्यांनी मिझोरमचे राज्यपाल (१९९० ते १९९३) म्हणून काम केले.
१९९८-२००४ मध्ये ते हरियाणातून राज्यसभेचे खासदार झाले. तर या कालावधीत सुषमाजी लोकसभेवर होत्या.
१९८६ साली त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केल्याच्या फक्त एक वर्षानंतर त्यांना महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले.
Dattatray Bharne : कृषी मंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय, मोठ्या योजनेचा लाभ महाडीबीटीतून थेट खात्यावर