Dattatray Bharne : कृषी मंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय, मोठ्या योजनेचा लाभ महाडीबीटीतून थेट खात्यावर

Aslam Shanedivan

महाडीबीटी पोर्टल

शेतीच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांना दिला जातो.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

सुरक्षा सानुग्रह योजना

आता या महाडीबीटीच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

कृषी मंत्री

शेतीतील कामांदरम्यान होणाऱ्या अपघातांत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

अर्ज प्रक्रिया डिजिटल

यापूर्वी सुरक्षा सानुग्रह योजनेसाठी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

2 लाख रुपये

सरकार 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत असून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये देते.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

1 लाख रुपये

तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत शेतकरी किंवा वारसदारांना करते.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

योजनेसाठी अनुदान

पूर्वी या योजनेसाठी शेतकरी व वारसदारांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव व कागदपत्रे सादर करावी लागत; त्रुटी किंवा विलंब झाल्यास अनुदान मिळत नसे.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

120 कोटींची तरतूद

आता अर्जप्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन झाल्याने शेतकऱ्यांना कार्यालयांचे फेरफटके टळून त्रुटी त्वरित दुरुस्त करता येतील; सन 2025-26 साठी 120 कोटींची तरतूद आहे.

Gopinath Munde Accident Security Scheme Through MahaDBT | sarkarnama

Marathi actress wedding : लोकप्रिय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; झाली थेट शिवसेना नेत्याची सून, पाहा खास फोटो

आणखी पाहा