Kumar Saptarshi: महाराष्ट्राच्या पुरोगामी अन् समाजवादी चळवळीतील बुलंद आवाज; युवकांशी का जोडलं गेलं कुमार सप्तर्षींचं नाव?

Deepak Kulkarni

गांधीवादाचे खंदे पुरस्कर्ते

पुण्यातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादाचे खंदे पुरस्कर्ते व लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

Kumar Saptarshi | Sarkarnama

'युक्रांद'ची स्थापना

कुमार सप्तर्षी यांनी सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित करून ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती.

Kumar Saptarshi | Sarkarnama

शिकवण

त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून हजारो तरुणांना गांधीवाद,समाजवाद, परिवर्तनवाद, सामाजिक समरसता, लोकशाही मूल्यांची शिकवण दिली.

Kumar Saptarshi | Sarkarnama

प्रभावी लेखक

डॉ. सप्तर्षी हे सामाजिक कार्यकर्तेच नव्हे, तर प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

Kumar Saptarshi | Sarkarnama

प्रभाव

महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा प्रभाव त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये झळकत होता.

Kumar Saptarshi | Sarkarnama

विरोधातला आवाज

समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला.

Kumar Saptarshi | Sarkarnama

आंदोलनांमध्ये सहभाग

सप्तर्षी यांचा अखेरपर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग राहिला.

Kumar Saptarshi | Sarkarnama

आमदार

कुमार सप्तर्षी यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता. यानंतर त्यांनी 9 ऑगस्ट 1977 रोजी चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात प्रवेश केला होता. जनता पक्षातर्फे 1978 साली ते अहमदनगरमधून आमदार बनले होते. 

Kumar Saptarshi | Sarkarnama

NEXT: CM विजय 'मामा' कडून लाडक्या भाच्याला सोन्याची अंगठी, काय आहे योजना?

CM Vijay Gold Ring Scheme | Sarkarnama
येथे क्लिक करा...