Rajanand More
माजी आमदार अंजली निंबाळकर यांची सध्या जगभरात चर्चा होत आहे. त्यांनी विमानात एका अमेरिकन युवतीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
अंजली निंबाळकर या कर्नाटकातील खानापूरच्या आमदार होत्या. त्या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.
गोवा-दिल्ली विमानातून शनिवारी निंबाळकर प्रवास करत होत्या. यावेळी एक अमेरिकन युवती अचानक बेशुध्द पडते. विमानात धावपळ सुरू असताना अंजली यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले.
अंजली या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. वेळ न घालविता त्या अमेरिकन युवतीच्या मदतीला धावल्या. तरुणीला तपासल्यानंतर तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाल्याचे लक्षात आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने तरूणीला कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशनने CPR सुरू केले. काही सेकंदातच तरुणीचे हृदय पुन्हा धडधडू लागले.
काही मिनिटांत तरूणी पुन्हा बेशुध्द पडली. त्यामुळे सर्वचजण हादरले. पण डॉ. अंजली यांनी न डगमगता प्रथमोपचार सुरूच ठेवले. ती शुध्दीत आल्यानंतर सगल्यांचाच जीव भांड्यात पडला.
अंजली यांनी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित तरूणीला रुग्णवाहिकेत नेईपर्यंत तिच्या सोबतच होत्या. एक क्षणही तिला सोडले नाही.
विमानातच अमेरिकन तरुणीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत अंजली यांनी संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.