Jaywantrao Jagtap : माजी आमदार जयवंतराव जगताप पुन्हा करमाळ्याच्या राजकीय केंद्रस्थानी

Vijaykumar Dudhale

नामदेवराव जगतापांचे चिरंजीव

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे प्रमुख, करमाळ्याचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार (स्व.) नामदेवराव जगताप यांचे जयवंतराव जगताप हे चिरंजीव आहेत.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

जगताप गटाचा राजकीय वारसा

नामदेवराव जगताप यांच्यानंतर जगताप गटाचा राजकीय वारसा जयवंतराव जगताप हे पुढे चालवत आहेत.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

१९९० मध्ये आमदार

जयवंतराव जगताप हे १९९० च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतरच्या पुढील दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

शिवसेनेच्या चिन्हावर पुन्हा विजय

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जयवंतराव जगताप हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, पुढच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी फेकले होते.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

संजय शिंदेंना पाठिंबा

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळ्यातून आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यावर शिंदे हे पहिल्यांदाच करमाळ्यातून निवडून आले आहेत.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

बाजार समितीचे सभापती

रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत सभापतिपदाची धुरा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हाती सोपवली.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत केलेल्या मदतीतून उतराई होण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

जयवंतराव जगतापांची भूमिका गुलदस्त्यात

विद्यमान राजकीय परिस्थिती पाहता विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जयवंतराव जगताप यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, ते माजी आमदार नारायण पाटील यांच्याशी जुळवून घेतील, अशी सध्याची चिन्हे आहेत.

Jaywantrao Jagtap | Sarkarnama

महाराष्ट्रातील 10 सर्वांत श्रीमंत आमदार कोण? भाजप अन् काँग्रेसच्या कितीजणांकडे सर्वांधिक संपत्ती?

Maharashtra Richest Mla | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा