Akshay Sabale
कन्नडचे माजी आमदार नितीन सुरेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधानसभेपूर्वी कन्नड मतदारसंघात संभाव्य उमेदवारीसाठी पाटील यांनी निर्णय घेतल्याचं बोललं जातं.
संबंधित पक्षांतर ही पाटील यांची पाचवी राजकीय कोलांटउडी ठरली. अलीकडच्या तीन वर्षांत त्यांचे चौथे पक्षांतर आहे.
पाटील कन्नड विधानसभा मतदारसंघातून 2004 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते.
पाटील 2004 मध्ये आमदार झाल्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून मनसेचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पराभव केला होता.
काँग्रेसने त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती.
पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकीकृत शिवसेना असताना शिवसेनेत पक्षांतर केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिंदेसेनेत गेले होते.