Rashmi Mane
एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर तुम्ही तुमच्या ध्येय सहज गाठू शकता.
संकटावर मात करत आणि अडचणींना तोंड देत हिमांशु गुप्ता यांनी आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज 70 किमी प्रवास करावा लागायचा. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात कामही केले.
उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले. गुप्ता यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे. पैसे कमावण्यासाठी ते चहाचा टपरी चालवत, पण त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाही.
हिमांशू यांनी कोचिंगशिवाय तीनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात ते नागरी सेवांसाठी पात्र ठरले पण त्याची निवड फक्त IRTS साठी झाली.
त्यांनी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत 309 वा क्रमांक मिळवून ते आयपीएस झाले. मात्र, ते त्याच्या निकालावरही खूश नव्हते.
त्यांच्या शेवटच्या प्रयत्नात, त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि शेवटी 2020 मध्ये अखिल भारतीय 139 व्या रँकसह भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी बनण्याची त्यांची आकांक्षा पूर्ण केली.