Vijaykumar Dudhale
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्यावर सोपवला आहे.
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजप लढविणार की, शिंदेंची शिवसेना यावर अजूनही एकमत झालेले नाही. मात्र, भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येते
शिवसेना-भाजपचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे आणि डॉ. भागवत कराड हे होळी पूजनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यांनी एकमेकांना रंग लावून होळी साजरी केली.
होळी पूजनासाठी एकत्र आलेले डॉ. कराड यांना चंद्रकांत खैरे यांनी ‘कराड, तुमचे तिकीट फायनल झाले का,’ असा सवाल केला.
खैरे यांचा प्रश्नाला डॉ. कराड यांनीही हजरजबाबीने उत्तर दिले. ‘खैरेसाहेब, अगोदर तुमचे फायनल झाले का ते सांगा,’ असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत भाष्य करणे टाळले.
डॉ. भागवत कराड हे राज्यसभेचे खासदार असून, त्यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
चंद्रकांत खैरे हे दोन वेळा आमदार, राज्यात मंत्री आणि सलग चार वेळा खासदार राहिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात चंद्रकांत खैरे यांची भूमिका महत्त्वाची समजली जाते.
R