सरकारनामा ब्यूरो
IPS श्रद्धा नरेंद्र पांडे या योगी सरकारमध्ये प्रयागराजची महत्त्वाची जबाबदारी मिळालेल्या अधिकारी आहेत.
उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये कुशल आयपीएस अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली आहे.
2017 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी श्रद्धा या सध्या प्रयागराज पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून तैनात आहेत.
पोलिस सेवेपूर्वी विमा आणि आयसीएलएसमध्ये काम केलेल्या श्रद्धा यांनी बायोटेक्नॉलॉजी मध्ये M-TECH केले आहे.
महाराष्ट्राच्या श्रद्धा यांनी डिफेन्स परीक्षेतही चौथी रँक मिळवली होती. परंतु दृष्टिदोषामुळे मेडिकल फेरी पार करू शकल्या नाहीत.
सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश मिळवण्यासाठी 3 वर्षे, तर IPS होण्यासाठी 2 वर्षे लागली. कठोर मेहनतीने त्या आज अधिकारी झाल्या आहेत.
15 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना DG COMMENDATION DISC SILVER पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नानंतर त्यांची उत्तर प्रदेश केडरमधून पश्चिम बंगालमध्ये बदली करण्यात आली होती.
बदलीनंतर पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमध्ये त्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक होत्या.
R