Mangesh Mahale
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणारे मुंबईची माजी पोलिस आयुक्त विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पांडे याच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
ईडीने चौकशीनंतर त्यांनी अटक केली होती. ते पाच महिने तिहार जेलमध्ये होते.
पांडे यांनी 2001 मध्ये पोलिस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला होता.आयसेक सर्व्हिसेस (आयटी) ही कंपनी सुरू केली.
त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यांनी 2006 मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला कंपनीत संचालकपद दिले.
पोलिस आयुक्त पदावरुन 30 जून 2022 रोजी निवृत्त झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढविणार असल्याचे त्यांनी फेसबुकवरुन जाहीर केले आहे.